About Us

March 22, 2016
Smita Haldankar

मित्रानो,
सौ. स्मिता हळदणकर चा हृदय पूर्वक नमस्कार!!!!!
आपण इथ वर आलात आपले मना पासून आभार,
जगातील प्रथम मराठी घोषवाक्य वेबसाइट MarathiSlogans.com वर आपले हार्दिक स्वागत आहे. ह्या Website चा मुख्य उदेश वेगवेगळ्या सामाजिक विषयावरील प्रश्न, कारण व उपाय घोषवाक्य च्या मध्यातून लोकांपर्यंत पोचवायचा. ज्या द्वारे समाजात जागृती निर्माण करण्याचा हेतू आहे.

आपल्या नवीन मराठी पिढीच्या जीवनाला सामाजिक संस्कृती चे वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न आहे…

माझ्या बद्दल थोडे काही आपल्याला जाणून घ्यायला नक्की आवडेल.
माझी मातृभाषा गुजराती आहे व सासर मराठी आहे. २७ वर्ष मराठी संस्कृती मध्ये वावरणं चालू आहे. मला मराठी साहित्याची आवड आहे कारण माझ्या पतीजींना वाचनाची प्रचंड आवड असल्यास घरात पुस्तकांचा भंडार आहे. मराठी बोलणे, वाचणे मला छान जमते…फक्त मराठी शुद्धलेखनात कधी कधी चुकते.

मी एक विज्ञान शिक्षिका होते २३ वर्ष सर्व्हिस करून स्वैच्छिक सेवा निवृत्ती घेतली. शाळेत असताना विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन खूप प्रोजेक्ट्स बनवले होते…त्यात पॉप्युलेशन एज्युकेशन माझा आवडता विषय असायचा. खूप बक्षिसे हि मिळवली होती.

इमेजेस बनवणं हा माझा छंद आहे व ते जोपासण्यासाठी माझ्या शाळेच्या व्यवसायातून २३ वर्षांनी सेवानिवृत्ती घेतली आहे.
माझ्या इतर हि ३ वेबसाइट्स आहेत.
इतर वेबसाइट्स व घरातले काम मधून फावल्या वेळात ह्या Websiteचे काम पाहत आहे. म्हणून रेग्युलर अपडेट करणं शक्य होत नाही.

इथे असलेले सर्व स्लोगन्स पैकी जवळ जवळ ८०% स्लोगन्स इतर भाषेतून मराठीत भाषांतर करून मी बनवले आहेत. फक्त उर्वरित स्लोगन्स मित्र व युसर्स नि सबमीट केले आहेत.

इथे असलेले इमेजेस मी स्वतः बनवले आहेत.

लोकांच्या आग्रहास्तव ब्रँड स्लोगन्स ची नवीन कॅटेगरी ऍड केली आहे.

🔊आवडलेले स्लोगन्स तुम्ही आपल्या मित्रांसोबत SHARE करू शकता. ( WhatsAPP, Facebook, Email ,Twitter व इतर सर्व )

स्लोगन्स चा उपयोग स्वतः साठी करू शकता पण इतर वेबसाइट किंवा अँप बनवून व्यवसाय करण्यास माझी हरकत असेल.

इमेजेस चा वापर करताना त्यावरील लोगो अबाधित राहिला पाहिजे.

❤ Website ला FB Likes देऊन आम्हाला प्रोत्साहन द्यायला विसरू नका.

जेवेढे जास्त लोक या Website शी जोडले जातील तेवढीच जास्त मेहनत घेण्यास आम्हाला उत्साह प्राप्त होईल.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवायला विसरू नका. आम्ही वाट पहात आहोत..

👇 प्रतिक्रिया पाठवण्यासाठी खालील मार्ग उपलब्ध आहेत..
Contact Us Here 👈

धन्यवाद व अनेक शुभेच्छा.
सौ. स्मिता हळदणकर

मला मिळालेले बक्षिस चे काही फोटोग्राफ्स

35 Responses on “About Us”

Suvidhaon Gudekar says:

super cool well done i wish you can make more slogan

Yes Sure Will do…your wordings inspire me to do more..Thank you so much. 🌹🙂

Saurabh says:

Good I like it

Thank You Saurabh 🌹🙂

Raghunanndan charkha says:

I like these slogans very much I impress by your slogans !!!very nice

Thank You so much 🌹🙂

Shruti Kasar. says:

Your slogans are very nice.I loved them so much. I wrote so many from them.They are very nice one.
Thank You.
Shruti Kasar.

Thank You So Much Shruti. 🌹🙂

Anika says:

Very good slogans. Were useful…thank you.

Thank You so much Anika 🌹🙂

Aarti Desai says:

Khub chan aahe.

Ya navin upakram madhye aapan yashasvi vaho.

Dhanywad Aarti tai🌹☺

रफतउल्लाह खान अभियंता महानगरपालिका नांदेड says:

मि आपल्या सर्वांचे मना पासून आभार व कृतज्ञता व्यक्त करतो की मि निर्मित केलेले घोष वाक्य “पाणी देते प्रत्येक जिवास जीवनदान—–“प्रसिद्ध करण्यात आले.पुन्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. इंजि.रफत उल्लाह खान,उप-अभियंता पाणी पुरवठा विभाग,महानगरपालिका नांदेड.

Thank You so much sir
आम्ही users च्या slogans त्यांच्या नावासह प्रसिद्ध करतो।🌹🙂

VIJU BHAU MANDHARE says:

माझे खाजगी classes आहेत त्यासाठी एकदम उत्तम आणि उर्जायुक्त घोषवाक्य हवे आहेत

खासगी क्लासेस घोषवाक्य

खासगी क्लासेसचा घेऊन आधार,
शिक्षणाचे स्वप्न करु साकार।

काळाची गरज खासगी क्लास,
नोकरी मिळे हमखास।

खासगी क्लासेसचा घेऊन आधार,
गुणांचे स्वप्न करु साकार।

Priyank rajmanw says:

Please tell me slogan Non vej hotel tag line

नोन-वेज हॉटेल घोषवाक्य

जिभेला सुटेल पाणी,
नोन-वेज हॉटेल ही आजची पर्वणी।

नोन-वेज हॉटेल ची हीच खासियत,
तृप्त करील मन आणि पोट।

आमच्या हॉटेलची चवच न्यारी,
पुन्हा पुन्हा येण कराव माघारी।

Nilesh Sambhus says:

We have 60 years old sarvajanik ganesh mandalDr Raghuvirnagar Sarvajanik Ganeshotsav Mandal in Dombivli ((E)

Requred some solgan to highlight of our 60 th year ganesh festival

गणेशोत्सव घोषवाक्य

गणेशोत्सवा निमित्त करतात जागरण,
लोकमान्य टिळकांची बाणवावी शिकवण।
गणपती आहे बुद्धीची देवता,
तिची आराधना करावी सर्वदा।

गणरायाचे करावे नाम स्मरण,
सर्व विध्ने होतील हरण।

Amol says:

we want slogans in marathi for cancer awareness.

कॅन्सर पिडीत घोषवाक्य

कॅन्सरपिडीतांनो नका होऊ त्रस्त,
त्यावरही उपाय आता नाही दुरापास्त।

कॅन्सरपिडीतांनो व्हा आता निवांत,
आधुनिक उपचार शेवट करी सुखांत।

कॅन्सर कॅन्सर कॅन्सर शब्द डोक्यातून काढून टाका,
नवीन जगण्याची आशा तुम्हाला देत आहे हाका।

Nilesh Bahalkar says:

Namaskar

Ahmi gharguti masala banavto pan mothya pramanat. ani brand name tayar kelay “Mai’s Recipe” Amchya aai la Mai mhantat mhanoon Mai’s Recipe. ahmi kuthlech prakarche chemicals, preservative, colours, vaprat nahi. ekdum 100% pure masala.

please ahamala ek tagline / slogan sanga machya product sathi.

thank you

Mai’s मसाले घोषवाक्य

1) शुध्दतेची हमी Mai’s मसाल्याची चवच नामी.

2) सुगरणीच्या हाताची अनुभूती, Mai’s मसाले घरगुती.

dhananjay says:

website is too much good and unique.. idea is unique.. i like it..

Ravi says:

Namskar,
Mazha Ayurvedic products manf. Unit ahe
Company karita chota slogan please patwa.

जयंत जाखडे says:

नमस्कार
आम्ही पौष्टिक उपवासाची आणि साधी खमंग भाजणी घरगुती स्वरूपात बनवायला सुरावत केली आहे. आहानास भाजणी असे नाव आहे. तरी यासाठी आपण एक छोट स्लोगन वाक्य तयार करून द्यावं अशी विनंती.
आपला नम्र
जयंत जाखडे

नमस्कार,
आपणास माझ्या वेबसाइट वरील स्लोगन्स आवडले त्या बदल धन्यवाद.

आपल्या विनंती अनुसार आपल्या व्ययसायास अनुरूप स्लोगन्स केले आहेत। आवडले तर कळवा। फोटो पाठवा।

१) आला पावसाळा, मजाच मजा,
घरात करा, नाष्टा सकस ताजा,
खुशखुशित आणि पौष्टिक खमंग,
“आहाना भाजणी” तुमच्या संग‌.

२) घ्या मजा ॠतुंची, साथ आहे आमची,
घरात दरवळेल जेव्हा, खमंग, खुश खुशीत
“आहाना भाजणी”, तुम्ही ठराल घरी A1 सुगरणी.

३) खमंग, खुश खुशीत, ताजी अन् पौष्टिक,
“आहाना भाजणी” घराघरात प्रतिष्ठित.

४) भाजणी हवी खमंग, पौष्टिकता राखावी अभंग,
खुशखुशितपणाचा दरवळेल “आहाना भाजणी” ने घरा घरात सुगंध.

आपल्या नवीन व्ययसायाला सुयश मिळो, अशी शुभेच्छा.

अभिषेक शिंदे says:

आम्ही वैशाली मसाले या नावाने मसाला माणिफॅक्टरिंग युनिट ओपन करत आहोत तरी आम्हाला टॅग लाईन , स्लोगन सुचवावी

1) शुध्दतेची हमी वैशाली मसाल्याची चवच नामी.
2) सुगरणीच्या हाताची अनुभूती, वैशाली मसाले घरगुती.

Prasad Bhalchandra Karnik says:

ज्ञानाचा सदउपयोग नेहमी फुलासारखा त्याच्या सुघंदा सारखा दरवलत असतो परंतु दुरुउपयोग नेहमी आपल्याला संकटात आणतो

Varsha Borkar says:

Aamhi someshwar navane gharguti masale ani kapleshwar navane kandap masale manufacturing karto tari catchy taglines suggest karavet

1) शुध्दतेची हमी सोमेश्वर मसाल्याची चवच नामी.
2) सुगरणीच्या हाताची अनुभूती, कपलेश्वर मसाले घरगुती.

smita masale chiplun says:

please suggest some home made masale slogan

Leave a comment